Yuvraj Singh : लग्नाआधी युवराज सिंग या 5 अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता, दीपिका पदुकोणचाही यादीत समावेश

बी टाऊन
Updated Apr 07, 2022 | 19:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yuvraj Singh :भारतीय संघात युवराज सिंग हे असे नाव आहे, ज्याने भारतीय संघात राहून एक वेगळे स्थान मिळवले आहे. आणि संघासाठी सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. युवीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला अनेक वेळा ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. आणि याच कारणामुळे क्रिकेट करिअर व्यतिरिक्त युवीचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप चर्चेत असते.

Yuvraj Singh was in a relationship with 5 actresses before marriage
या 5 अभिनेत्रींसोबत युवराज सिंग रिलेशनशीपमध्ये होता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या 5 अभिनेत्रींसोबत युवराज सिंग रिलेशनशीपमध्ये होता
  • दीपिका पदुकोणच्या नावाचाही समावेश
  • बॉलिवूडच्या अभिनेत्रींसोबत युवराजच्या नावाची चर्चा होती

Yuvraj Singh : भारतीय संघात युवराज सिंग हे असे नाव आहे, ज्याने भारतीय संघात राहून एक वेगळे स्थान मिळवले आहे. आणि संघासाठी सामना विजेता म्हणून उदयास आला आहे. युवीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला अनेक वेळा ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. आणि याच कारणामुळे क्रिकेट करिअर व्यतिरिक्त युवीचे वैयक्तिक आयुष्य देखील खूप चर्चेत असते.


युवराज सिंगचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.आणि आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे युवीच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत.

किम शर्मा

1. किम शर्मा या यादीतील पहिले नाव आहे. युवी करिअरच्या सुरुवातीच्या काळात किमसोबत गंभीर नात्यात होता. आणि दोघांचे हे नाते तब्बल ४ वर्षे टिकले. पण रिपोर्ट्सनुसार, दोघांमधील अंतर त्यांच्या कुटुंबामुळे आले. कारण त्यांच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते, दोघांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि वेगळे झाले.

दीपिका पदुकोण

2. युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण यांचेही अनोखे नाते होते. तसं पाहायला गेलं तर, या नात्याबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. दोघांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. इतकेच नाही तर युवराजने स्वतः कबूल केले होते की त्याला ही सुंदर अभिनेत्री खूप आवडते. पण लग्नाआधीच त्यांचे मार्ग वेगळे झाले.

नेहा धुपिया

3. एक काळ असा होता जेव्हा युवी आणि नेहा धुपियाच्या नात्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळत होत्या. आणि 2014 मध्ये सोफी चौधरीच्या बर्थडे पार्टीमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. त्यामुळे नंतर दोघांच्या नात्याबद्दल अनेक अफवाही उठल्या होत्या. मात्र, त्यानंतरही दोघांच्या नात्यात प्रगती झाली नाही. त्यानंतर दोघे नेहमी मित्र म्हणून एकत्र असायचे आणि नेहा धुपियानेही युवीच्या लग्नाला हजेरी लावली होती. 

रिया सेन

4. युवराज आणि रिया सेन यांचा रोमान्स हा अल्पकालीन अफेअर मानला जात आहे. हे दोघे एका पार्टीत भेटले आणि त्यांचं ट्युनिंग चांगले जमले, त्यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेटही केले. 

हेजल कीच


5. हेजल कीच हे पाचव्या अभिनेत्रीचे नाव आहे, जिच्याशी युवी कधीही विभक्त होऊ शकला नाही. 4 अभिनेत्रींना डेट केल्यानंतर अखेर युवीला बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच मिळाली आणि दोघांनी 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न केले. याशिवाय दोघेही एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी