ड्रीम गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. १९४८मध्ये आजच्याच दिवशी त्यांचा जन्म मद्रास येथे झाला होता.
ड्रीम गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. १९४८मध्ये आजच्याच दिवशी त्यांचा जन्म मद्रास येथे झाला होता.
हेमा मालिनी प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेतच, पण त्या उत्तम नृत्यांगना आहेत. त्या भरतनाट्यम नृत्यकलेत अतिशय तरबेज आहेत.
हेमा मालिनी या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यासोबतच राजकारणातही यश मिळवले आहे. हेमा मालिनी या मथुरेच्या भाजपाच्या खासदार आहेत.
हेमा मालिनी यांनी लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल केली होती. ज्यातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला होता. जाणून घेऊया त्यांच्याकडे किती संपत्ती आहे.
शपथपत्रानुसार हेमा मालिनींकडे १२५ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या स्वअर्जित संपत्तीचे एकूण मूल्य १ अरब, १ कोटी, ११ लाख, ९५ हजार ३०० रुपये आहे.
हेमा मालिनी यांनी उमेदवारी दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचे पूर्ण विवरण दिले आहे. त्यांच्या बँकखात्यात जमा, रोख आणि दागिने १३ कोटी २२ लाख ९६ हजार ९४५ रुपये किंमतीचे आहेत.
हेमा मालिनी यांचे पती अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती १ अरब २५ कोटी ५४ लाख १२ हजार ९४१ रुपये आहे. अशाप्रकारे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती २५० कोटी इतकी आहे.
२०१४मध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची संपत्ती १७८ कोटी होती ज्यात २०१४मध्ये हेमा यांची संपत्ती ६६ कोटी रुपये होती. या हिशोबाने हेमा यांची संपत्ती पाच वर्षात दुप्पट झाली आहे. हेमा यांच्याकडे ७ कोटी ०४ लाख १५ हजार ८९५ रुपयांची बिगरशेती जमीन आणि आवासीय भवन आहे.