[VIDEO] 'या' सिनेमासाठी आमिरने मागितली चाहत्यांची माफी

बी टाऊन
Updated Nov 20, 2019 | 18:53 IST

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची शूटिंग सुरू झाली आहे. तसंच हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात त्याला अपयश आल्यामुळे, त्याने चाहत्यांची माफी मागितली.

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगबाबत काही दिवसांपूर्वीच चर्चा चालू होती. ती म्हणजे, दिल्लीतील घातक प्रदूषणामुळे या सिनेमाची शूटिंग रद्द करण्यात आली होती. त्यानंतर या सिनेमाची शूटिंग चंडीगढला करण्यात आली. तसंच या सिनेमात आमिर खान व्यतिरिक्त शाहरूख आणि सलमान खान हे दोनं सुपरस्टार या सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत, असं सांगितलं जातयं. 

मिळालेल्या माहितीनुसार, आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल केली नव्हती. त्यामुळे आमिर अस्वस्थ झाला होता. कारण त्याच्या आयुष्यात असं पहिल्यांदाच घडलं होतं. ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाची आमिरला भरपूर उत्सुकता होती. त्याला वाटलं त्याच्या चाहत्यांनाही हा सिनेमा प्रचंड आवडेल, परंतु असं झालं नाही. त्यामुळे त्याने या सिनेमाबाबत त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

 

 

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा'  सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यामध्ये आमिर पंजाबीच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि एक गोड स्माईल त्याने दिली आहे. या सिनेमाचं पोस्टर पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, असा अंदाज आहे. मात्र या सिनेमासाठी त्याच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे. कारण हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

अभिनेता आमिर खान एका वर्षात एकच सिनेमात काम करताना दिसतो. त्याचप्रमाणे त्याचे सिनेमाही हिट होतात. 'लाल सिंग चड्ढा' च्या सिनेमानंतर त्याचा अपकमिंग सिनेमा 'मोगल' आणि 'महाभारत' हे  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. परंतु या सिनेमासाठी सुद्धा त्याच्या चाहत्यांना अजून एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी