[VIDEO] बिग बॉस १३ या शोच्या मेकर्सने सुपरस्टार सलमान खानला दिली 'ही' ऑफर

बी टाऊन
Updated Nov 29, 2019 | 19:02 IST

अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस १३' या शोला पुढील पाच आठवड्यांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या शोच्या मेकर्सने, सलमानला अजून  २ कोटींची ऑफर देण्याचे ठरवलं आहे.

मुंबई : 'बिग बॉस १३' हा एक रिअॅलिटी शो असून, त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांपासून या शोमध्ये होणारा ड्रामा आणि धमाल या गोष्टींमुळे, बिग बॉस १३ शोची टीआरपी रेटिंग पॉइंट वाढत चालली आहे. त्यामुळे या शोच्या मेकर्सने बिग बॉस १३ अजून पाच आठवड्यांसाठी प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या शोचा होस्ट सुपरस्टार सलमान खान या शोला काही कारणास्तव सोडून जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस १३ या शोला अभिनेता सलमान खान होस्ट करत आहे. तसंच या शोचं फिनाले पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार होतं. मात्र छोट्या पडद्यावरील या शोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत असल्यामुळे, या शोच्या मेकर्सने अजून पाच आठवड्यांसाठी शोचं प्रक्षेपण करण्याचं ठरवलं आहे. पण सुपरस्टार सलमानचा 'राधे' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या शूटिंगसाठी त्याला बिग बॉस १३ हा शो मध्येच सोडावा लागणार आहे. परंतु या शोचं होस्टींग सलमानने सोडू नये, यासाठी शोच्या मेकर्सने त्याला २ कोटींची ऑफर दिली आहे.

 

 

'दबंग ३' या सिनेमानंतर सलमानचा राधे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती. राधे या सिनेमात सलमानचा लहान भाऊ सोहेल खान, जॅकी श्रॉफ आणि दिशा पटानी हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. तसंच राधे हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२० ला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी