VIDEO: 'या' आहे सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री, पाहा त्याचं मानधन 

बी टाऊन
Updated Apr 25, 2019 | 15:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूडमध्ये आता अभिनेत्रींचं मानधन बरंच वाढलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणपासून कंगना रनौतपर्यंत अनेक अभिनेत्री आता काही कोटींच्या घरात मानधन घेतात.

priyanka and deepika_instagram
VIDEO: 'या' आहे सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री, पाहा त्याचं मानधन  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडमध्ये कलाकारांना खूपच चांगलं मानधन मिळतं. पण अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना कमी पैसे मिळतात असं नेहमीच म्हटलं जातं. पण आता तसं अजिबात राहिलेलं नाही. कारण हळूहळू आता हे समीकरण बदलत चाललं आहे. कारण आता बॉलिवूडमध्ये अभिनेत्री देखील तितक्याच सशक्तपणे आपल्या भूमिका साकारत आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत. आता अभिनेत्री या हिरोसोबत फक्त नाचण्या-गाण्यापुरता मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या देखील उत्कृष्ट भूमिका साकारत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच आता अभिनेत्री देखील आपलं मानधन स्वत: ठरवत आहेत. बॉलिवूडमधील अनेक टॉप अभिनेत्रींचं मानधन हे आता काही अभिनेत्यांपेक्षाही अधिक आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, कोणत्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक कमाई करत आहेत: 

दीपिका पदुकोण: 
दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. जिने पद्मावत, ये जवानी है दिवानी, रामलीला यासारख्या १०० कोटींची कमाई केलेल्या सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे सध्या ती प्रत्येक सिनेमासाठी जवळजवळ १३ ते १५ कोटी रुपये मानधन घेत असल्याचं समजतं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

???

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

कंगना रनौत: 
करीना कपूर आणि बॉलिवूडकरांचं नातं कसं आहे हे आपल्या सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. पण तरीही सिने क्षेत्रात तिने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. या वर्षी तिचा मणिकर्णिका हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. सध्या तिच्याकडे अनेक मोठ्या बॅनर्सचे सिनेमे देखील आहेत. कंगना सध्या प्रत्येक सिनेमासाठी १० ते १२ कोटी रुपये घेते. 

 

 

करीना कपूर-खान: 
करीना कपूर-खान ही बॉलिवूडमधील हॉटेस्ट मॉमपैकी एक आहे. अनेकदा आपण पाहतो की, अभिनेत्री आई झाल्यानंतर सिनेसृष्टीपासून दूर जातात. पण याबाबतीत करीना ही अपवाद आहे. ती सध्या सिनेसृष्टीत खूपच अॅक्टिव्ह असून प्रत्येक सिनेमासाठी ती जवळजवळ १० ते १२ कोटी रुपये मानधन घेते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by kareena k khan offical (@kareenakapoorkhanoffi) on

 

कतरीना कैफ: 

कतरीना कैफ ही लवकरच 'भारत' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता सलमान खानसोबत दिसणार आहे. सध्या तिच्याकडे बरेच सिनेमे देखील आहेत. ती रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये देखील काम करणार आहे. प्रत्येक सिनेमासाठी कतरिनाचं मानधन हे १० ते ११ कोटी रुपये एवढं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ht style awards ? Trendsetter of the year ??@chandiniw @subbu28 @amitthakur_hair

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

प्रियंका चोप्रा: 
प्रियंका चोप्रा ही आता इंटरनॅशनल सेलिब्रिटी झाली आहे. कारण बॉलिवूडसोबत ती आता हॉलिवूडमध्येही काम करते. गेल्या काही दिवसात प्रियंका फारच कमी हिंदी सिनेमात दिसून आली आहे. तिने बॉलिवूडमध्ये 'जय गंगाजल' हा शेवटचा सिनेमा केला आहे. प्रियंका सध्या आपल्या प्रत्येक सिनेमासाठी ८ ते ९ कोटी रुपये घेते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@eliesaabworld ???

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

या अभिनेत्रींशिवाय श्रद्धा कपूर ही प्रत्येक सिनेमासाठी ८ ते ९ कोटी, सोनम कपूर जवळजवळ ७ ते ८ कोटी, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट या दोघी प्रत्येक सिनेमासाठी ६ ते ८ कोटी तर सोनाक्षी सिन्हा ही प्रत्येक सिनेमासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: 'या' आहे सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्री, पाहा त्याचं मानधन  Description: बॉलिवूडमध्ये आता अभिनेत्रींचं मानधन बरंच वाढलं आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणपासून कंगना रनौतपर्यंत अनेक अभिनेत्री आता काही कोटींच्या घरात मानधन घेतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles