[VIDEO] अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बी टाऊन
Updated Dec 10, 2019 | 20:00 IST

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तसंच या सिनेमात दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या मालतीची भूमिका साकारली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या सिनेमाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. या सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं होतं. त्यामुळे या सिनेमाच्या पोस्टरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसंच आता 'छपाक' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मालतीच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक हा सिनेमा २००५ मध्ये अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर आधारित आहे.

छपाक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये, मालती आपल्या जीवनात खूप आनंदीत आहे, असं दाखवलं गेलयं. परंतु जेव्हा तिच्यावर अॅसिड हल्ला होतो. त्यानंतर मालती आपल्या जीवनात कशापद्धतीने बदल करते. या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला छपाक या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस असल्यामुळे, या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तसंच छपाक हा सिनेमा पुढील वर्षी १० जानेवारी २०२० ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

 

 

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या जोडीला,अभिनेता विक्रांत मॅसी हा लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दीपिका आणि विक्रांत या दोघांनाही ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

छपाक या सिनेमानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणचा '८३' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमासुद्धा भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ८३ हा सिनेमा पुढील वर्षी १० एप्रिल २०२० ला रिलीज होणार आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी