[VIDEO] जॉन अब्राहमच्या अटॅक सिनेमात झळकणार 'ही' अभिनेत्री

बी टाऊन
Updated Nov 27, 2019 | 19:19 IST

अभिनेता जॉन अब्राहमच्या 'अटॅक' या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचं नाव घेतलं जात आहे. ती म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही अटॅक सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा 'अटॅक' हा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची चर्चा सुरू होती. मात्र या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी एका अभिनेत्रीचं नाव घेतलं जात आहे. ती म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही अटॅक सिनेमात मुख्य भूमिका करताना दिसणार आहे. तसंच या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम व्यतिरिक्त अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सुद्धा दिसणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, 'ड्राइव्ह' सिनेमानंतर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अटॅक या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जॅकलीनने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसंच जॅकलीन या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. 

अभिनेता जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला. तसंच या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम आणि प्रतिसाद मिळाला. यानंतर जॉनच्या अटॅक या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. अटॅक या सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्य आनंद आहेत. हा सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे आणि सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून सूरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अटॅक हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२० ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

जॅकलीन फर्नांडिसच्या अटॅक या सिनेमानंतर, ती सुपरस्टार सलमान खानच्या सिनेमात दिसणार आहे. सलमान खानचा 'किक २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच किक २ हा पहिल्या सिनेमाचा दुसरा भाग असणार आहे. 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी