[VIDEO] अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला आपला भन्नाट अनुभव 

बी टाऊन
Updated Oct 14, 2019 | 10:43 IST

अभिनेत्री मौनी रॉय ही सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता तिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याविषयीच तिने झूमला एक विशेष मुलाखत दिली.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावा आणि मौनी रॉय यांनी नुकतीच 'झूम'शी खास बातचीत केली. यावेळी या दोन्ही कलाकारांनी आपल्या करिअरबाबत आणि खासगी आयुष्याविषयी देखील गप्पा मारल्या. राजकुमारने यावेळी सांगितलं की, एका सीनियर कलाकाराच्या मदतीने त्याला पहिला सिनेमा मिळाला. तर मौनीने सांगितलं की, ती ९ वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. पण आता ती या सगळ्यातून वेळ काढत सिनेमांमध्ये देखील काम करत आहे. 

याच दरम्यान, मौनीने बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमामधील आपला अनुभव देखील शेअर केला. दरम्यान या दोघांचा 'मेड इन चायना'  हा सिनेमा २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी