[VIDEO] प्रियंका चोप्राचा आनंद गगनात मावेना, पण झालं तरी काय? 

बी टाऊन
Updated Feb 27, 2020 | 21:24 IST

Priyanka Chopra video with nick jonas: प्रियंका चोप्राने आपला पती निक जोनससह एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. पाहा नेमका काय आहे हा व्हिडिओ 

मुंबई: देसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा नवरा निक जोनाससोबत खूप आनंदी दिसते आहे. इंस्टाग्रामवर ५० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. प्रियंकाने निक जोनासच्या रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमात जज म्हणून पदार्पण केल्याबद्दल देखील  आनंद व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर ५० मिलियन फॉलोअर्स पूर्ण केल्याचा आनंद तिने अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ज्याचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्रॅमी 2020 अवॉर्डमध्ये प्रियंका चोप्रा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी बरीच चर्चेत होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी