[VIDEO] तापसी पन्नूच्या नव्या सिनेमातील नवं गाणं 

बी टाऊन
Updated Feb 06, 2020 | 22:03 IST

Taapsee Pannu: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिचा लवकरच नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिनेमाचं एक गाणं आता रिलीज झाला आहे. 

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या 'थप्पड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता 'एक टुकड़ा धूप' हे या  सिनेमाचं पहिले गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं आपल्याला देखील भावनावश करेल. या गाण्याला राघव चैतन्यने आवाज दिला आहे. तर शकील आझमी यांनी हे गीत लिहिलं आहे. 

थप्पड हा घरगुती हिंसाचाराविरूद्ध समाजाला योग्य आरसा दाखविणारा सिनेमा आहे. ज्यामध्ये तापसी पतीने एक चापट मारल्यामुळे आपल्या पतीकडून घटस्फोट घेत असते. अनुभव सिन्हाचा हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी