या फॅशन शोमध्ये आदित्य आणि अनुष्का भेटले होते पहिल्यांदा

Aditya Seal And Anushka Ranjan: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे आदित्य सील आणि अनुष्का रंजन नुकतेच एका फॅशन शोदरम्यान स्पॉट झाले. अभिनेत्याने या फॅशन शोबाबत एक मजेदार किस्सा त्याच्या चाहत्यांना सांगितला.

aditya and anushka met for the first time in fashion show
या फॅशन शोमध्ये आदित्य आणि अनुष्का भेटले होते पहिल्यांदा 

Aditya Seal And Anushka Ranjan: नुकत्याच झालेल्या फॅशन शोमध्ये आदित्य सील (Aditya Seal) आणि अनुष्का रंजन (Anushka Ranjan) यांनी रॅम्प वॉक केला. बॉलिवूडची ही प्रसिद्ध जोडी ब्लॅक मॅचिंग आउटफिटमध्ये दिसली. 

या सुंदर आउटफिटमध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते. त्याचवेळी या फॅशन शोमध्ये अनुष्का रंजन शो स्टॉपर ठरली. आदित्य सील आणि अनुष्का रंजन यांनी संवाद साधताना सांगितले की, त्यांना या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकची संधी मिळाल्याचा त्यांना अभिमान आहे. यासोबतच आदित्य सीलने असेही सांगितले की, याच फॅशन शोमध्ये जवळपास 5 वर्षापूर्वी तो पहिल्यांदा अनुष्का रंजनला भेटला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी