मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला बॉलिवूडमधून टीकास्ट केलं होतं का? हा प्रश्न तिच्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो. आता शिल्पा शेट्टी हिने देखील हे कबूल केलं आहे. 90च्या दशक तिच्यासाठी फार काही चांगलं नव्हतं. ती बॉलिवूडमध्ये टायकास्ट झाली होती. शिल्पा शेट्टीने तिच्या कारकीर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत.
१ ९९३ साली बाजीगर चित्रपटातून शाहरुख खानबरोबर चित्रपटसृष्टीत पदार्पणानंतर २००० पर्यंत तिला दुय्यम दर्जाच्या भूमिकाचा साकाराव्या लागल्या. पण धर्मेश दर्शनच्या ‘धडकन’ या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीत मोठा बदल घडविला. त्यानंतर ती एकापेक्षा जास्त बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसू लागली. दरम्यान, आता हे पाहावं लागणार आहे की, लवकरच रिलीज होणाऱ्या हंगामा आणि निकम्मा या चित्रपटातून ती कमाल करते हे पाहावं लागणार आहे.