रणवीर सिंह नंतर आता मलायका अरोरा आणि उर्फी जावेदवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप

Malaika Arora and Urfi Javed in trouble: मलायका अरोरा आणि उर्फी जावेद या अडचणीत येताना दिसून येत आहेत. दोघींवरही अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

after Ranveer singh now malaika arora and urfi javed accused of spreading obscenity
रणवीर सिंह नंतर आता मलायका अरोरा आणि उर्फी जावेदवर अश्लीलता पसरवल्याचा आरोप 

Malaika Arora and Urfi Javed: अभिनेता रणवीर सिंह याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. रणवीर सिंह याने अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत त्याच्यावर एफआयआर दाखल झाली आहे. त्यानंतर आता उर्फी जावेद आणि मलायका अरोरा यांच्यावरही अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यासोबतच मलायका अरोरा सुद्धा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून उर्फी जावेद आणि मलायका अरोरा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.

ही तक्रार करताना तक्रारदारांनी मलायका आणि उर्फी यांचे काही फोटोजही शेअर केले आहेत. मलायका आणि उर्फी यांनी भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप या संघटनेने आपल्या तक्रारीत केला आहे. भारतीय समाजात महिलांना देवाचा दर्जा दिला जातो. या दोन्ही स्टार्समुळे भारतीय समाजात चुकीचा संदेश जात असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी