सिनेमा फ्लॉप झाल्यानंतरही रणबीरच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आलिया भट्ट

Alia Bhatt on Shamshera failure: रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. यानंतर आलिया भट्टने आपल्या पतीचा बचाव केला आहे. जाणून घ्या काय म्हणाली आलिया भट्ट...

after shamshera movie flop alia bhatt came out in support of husband ranbir kapoor started south vs bollywood debate
रणबीरच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आलिया भट्ट  |  फोटो सौजन्य: Instagram

Alia Bhatt defends Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा चित्रपट शमशेरा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. मात्र, चित्रपटाच्या अपयशानंतरही आलिया भट्टने आपल्या पतीचा बचाव केला आहे. यादरम्यान आलिया भट्टने बॉलीवूड विरुद्ध दक्षिण वाद पुन्हा सुरू केला आहे. 

आलिया भट्ट म्हणाली, 'भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे खूप कठीण वर्ष आहे. हिंदी चित्रपटांबाबत आपण थोडे सॉफ्ट व्हायला हवे. बॉलिवूड आणि हिंदी सिनेमांवर आपण अनेक कमेंट करत असतो. पण, ज्या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली त्या चित्रपटांची आपण गणना करत आहोत का?' 

'साऊथ इंडस्ट्रीतही सर्वच चित्रपटांनी चांगली कमाई केलेली नाही. एक चांगला चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेहमीच चांगली कमाई करतो.' 

आलिया भट्ट सध्या तिच्या डार्लिंग्स चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाद्वारे ती निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. चित्रपटात आलियाशिवाय शेफाली शाह आणि विजय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी