[VIDEO]: अजय देवगन आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकत्र दिसणार, पाहा काय आहे कारण

बी टाऊन
Updated Aug 09, 2019 | 15:05 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सात वर्षानंतर अभिषेक बच्चन सोबत काम करणार आहे. एका सिनेमासाठी हे दोघे एकत्र येणार आहेत. या सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रूज देखील दिसणार आहे.

new film
अभिषेक बच्चन  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: 'युवा', 'जमीन', 'बोल बच्चन' या सिनेमांच्या यशानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेते अजय देवगन आणि अभिषेक बच्चन एकत्र सिनेमामध्ये दिसणार आहेत. बातमीनुसार, अभिषेक लवकरच अजय देवगन निर्मित सिनेमामध्ये मुख्य भूमिका करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री इलियाना डिक्रूजच नावही निश्चित झालं आहे.

मात्र अभिषेकच्या विरुद्ध  इलियाना डिक्रूज नसून दुसरी अभिनेत्री दिसणार आहे.  ही अभिनेत्री कोण असणार हे अजून निश्चित झालं नाहीये. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी करणार आहेत. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून या सिनेमाचे शूटिंग वर्षाच्या अखेरीस सुरू होईल. या सिनेमाची कथा १९९० ते २००० मधील भारताच्या आर्थिक स्थितीवर आधरित आहे. अभिषेक बच्चनने करिअरची सुरवात अनुराग कश्यपच्या 'मनमर्झियाँ'  या सिनेमाने केली होती. सध्या अजय देवगन 'भुज- प्राइड ऑफ इंडिया' या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२० मध्ये होणार प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...