[VIDEO] संजय भन्साळीच्या 'या' सिनेमासाठी, अभिनेता अजय देवगणची पसंती

बी टाऊन
Updated Nov 29, 2019 | 19:35 IST

अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठीयावाडी' हा अपकमिंग सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच या सिनेमात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या अपकमिंग सिनेमाची चर्चा सध्या सुरू आहे. या सिनेमाचं नाव 'गंगूबाई काठीयावाडी' आहे. काही कारणास्तव 'इंशाअल्लाह' या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बंद केली. त्यानंतर त्यांनी गंगूबाई काठीयावाडी या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच या सिनेमात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार, असल्याची माहिती समोर आली आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमात अभिनेता अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे संजय भन्साळीने अभिनेता अजयला गंगूबाई काठीयावाडी या सिनेमासाठी अप्रोच केलं. त्यानंतर अजयने या सिनेमासाठी ग्रीन सिग्नल दाखवला आहे. 

 

 

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठीयावाडी या सिनेमाची शूटिंग काही दिवसानंतर सुरू करण्यात येणार आहे. कारण अभिनेत्री आलिया भट्टच्या 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाची शूटिंग अद्यापही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे संजय भन्साळी यांनी गंगूबाई काठीयावाडी या सिनेमाची शूटिंग थांबवली आहे. तसंच हा सिनेमा गंगूबाई कोठेवाडी या महिलेवर आधारीत आहे आणि  गंगूबाई काठीयावाडी सिनेमा पुढच्या वर्षी ११ सप्टेंबर २०२० ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी