आलिया भट्टच्या डिलिव्हरीची तारीख आली समोर

Alia Bhatt and Ranbir kapoor jet off for babymoon?: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विमानतळावर एकत्र दिसले. हे जोडपे एकत्र बेबीमूनवर गेले असल्याची सध्या चर्चा आहे.

alia bhatt ranbir kapoor go on babymoon delivery date of actress has been revealed
आलिया भट्टच्या डिलिव्हरीची तारीख आली समोर  |  फोटो सौजन्य: Instagram

Alia Bhatt and Ranbir kapoor babymoon?: मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता 'ब्रह्मास्त्र' गाण्याच्या प्रीव्ह्यू लॉन्चच्या एका दिवसानंतर, हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसले. दोघेही विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र बेबीमूनवर गेल्याची चर्चा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर एका यूजरने कमेंट करत 'बेबीमून?' दुसऱ्याने लिहिले- 'ते बेबीमूनवर जात आहे का?' 

आलिया भट्ट सध्या 4 महिन्यांची गरोदर आहे आणि या जोडप्याला डिसेंबरमध्ये बाळाची अपेक्षा आहे. होय, या वर्षाच्या अखेरीस आलियाच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. आलिया आतापासून तिची पूर्ण काळजी घेत आहे आणि तिच्या नवजात बाळाच्या आगमनासाठी खूप उत्सुक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी