Alia Bhatt COVID 19 Report: आलिया भट्टचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह, रणबीरसारखीच झाली घरात आयसोलेट 

Alia Bhatt  COVID 19: अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर चाहत्यांना आलिया भट्टच्या प्रकृतीची चिंता वाटत होती. आलियाचा  कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला

alia bhatt tested covid 19 negative after sanjay leela bhansali ranbir kapoor tested positive
Alia Bhatt COVID 19 Report: आलिया भट्टचा कोरोना रिपोर्ट आला   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
  • आलियाने स्वत: ला केले अलग 

मुंबई :  अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हापासून आलिया भट्टच्या तब्येतीबाबत कयास सुरू होते. ताज्या रिपोर्टनुसार आलिया भट्टचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार आलिया भट्टची दररोज चाचण्या करत आहे आणि तिचा अहवाल आजही निगेटिव्ह आला आहे. तथापि, त्यांनी स्वत: ला वेगळे केले आहे. 

वृत्तानुसार, ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. चित्रपटात त्याच्या अपोझिट आलिया भट्ट आहे.  संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया मुख्य अभिनेत्री आहे.  

 गंगूबाई काठियावाड़ी'ची शूटिंग थांबली

,संजय लीला भन्साळी जात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गंगूबाई काठियावाड़ी चित्रपटाची शुटिंग बंद करण्यात आली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. 

कोरोनाची लागण झाल्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी स्वतःला घरातच विलग केले आहे. 30 जुलै 2021 रोजी गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

आई नीतू कपूर यांनी दिले निवेदन

रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केले. निवेदनात रणबीरच्या कोरोना संक्रमणाची पुष्टी दिली आहे. नीतू कपूर यांनी लिहिले की, 'रणबीरची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.'

नीतू सिंग यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'रणबीर औषधे घेत असून त्याची प्रकृती सुधारत आहे. तुम्ही दाखवलेल्या चिंतेमुळे आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. '

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी