दीपिका पदुकोणबाबत केलेल्या 'या' वक्तव्यामुळे आलिया भट्ट ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Koffee With Karan 7: कॉफी विथ करण सीझन ७ मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंह गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. यावेळी दीपिका पदुकोण संदर्भात केलेल्या एका कमेंटमुळे आलिया चांगलीच ट्रोल होत आहे.

Alia bhatt trolled over statment about deepka padukone watch video
दीपिका पदुकोणबाबत केलेल्या 'या' वक्तव्यामुळे आलिया भट्ट ट्रोलर्सच्या निशाण्यावर 

Alia Bhatt on Deepika Padukone: करण जोहर प्रसिद्ध चॅट शो असलेल्या कॉफी विथ करण मध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. यावेळी घडलेल्या एका गोष्टीमुळे अभिनेत्री आलिया भट्ट ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून सोशल मीडियात तिला नेटिझन्स चांगलेच ट्रोल करत आहेत.

चाहत्यांच्या मते, अभिनेत्री आलिया भट्ट आपली आणि दीपिका पदुकोणची तुलना करण्याचा प्रयत्न करत आहे. शोमध्ये आलियाने म्हटलं, संजय लीला भन्साळीने तीन सिनेमा दीपिकासोबत केले. अशा परिस्थितीत त्यांनी माझ्यासोबत चार सिनेमे करण्याचं आश्वासन दिलं आहे.

त्यापूर्वी रणवीरने आलिया संदर्भात म्हटलं होतं की, दीपिकाच्या तुलनेत त्यांची भाषा खूपच स्पष्ट आहे. तर दीपिका शारीरिक बाबतीत खूपच मजबूत आहे. यावर आलियाने म्हटलं होतं की, रणवीर ने असं तिच्या उंचीमुळे म्हटलं आहे. सोशल मीडियात आलियाच्या या विधानामुळे तिला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी