...म्हणून रणबीर कपूर सोबत आलिया भट्ट ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन करणार नाही

Ranbir Kapoor and Alia Bhatt: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र सिनेमाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

Alia Bhatt will not do promotion of brahmastra movie with ranbir kapoor watch what is reason
...म्हणून रणबीर कपूर सोबत आलिया भट्ट ब्रह्मास्त्र सिनेमाचं प्रमोशन करणार नाही 

Ranbir Kapoor and Alia Bhatt Brahmastra movie: ब्रह्मास्त्र सिनेमात अभिनेता रणबीर कूपर आणि आलिया भट्ट यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बी-टाऊनची ही लोकप्रिय जोडी या सिनेमाचं एकत्र प्रमोशन करणार नाहीये. आलिया भट्टची प्रेग्नेंसी लक्षात घेत सिनेमा निर्मात्यांनी एक खास स्ट्रॅटेजी बनवली आहे.

रणबीर आणि आलिया यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले तर सर्वांचे लक्ष दोघांच्या वैयक्तिक आयुष्याकडे अधिक असेल असं निर्मात्यांना वाटतं. सिनेसृष्टीतील एका सूत्राने सांगितले की, ब्रह्मास्त्र सिनेमानंतर अनेक गोष्टी घडल्या आहेत. आता रणबीर आणि आलिया केवळ जोडपं नाही तर पती-पत्नीही आहेत. या दोघांना बाळ होणार आहे. अशा परिस्थितीत प्रमोशन दरम्यान दोघांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींचा सिनेमावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिनेमात भूमिका केलेल्यांना असे होऊ द्यायचं नाहीये. विशेष म्हणजे रालिया (रणबीर आलिया) ला ब्रह्मास्त्र सिनमाच्या प्रमोशनसाठी अनेक शहरांमध्ये फिरावे लागणार आहे. अशा स्थितीत आलिया भट्टने जास्त प्रवास करणे योग्य ठरणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी