[VIDEO] रणवीरसोबत लग्नाचा विषय निघताच असं काही म्हणाली आलिया! 

बी टाऊन
Updated Feb 18, 2020 | 16:34 IST

अभिनेत्री आलिया भट्ट हिने रणबीरसोबत आपल्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. पाहा आलिया नेमकं काय म्हणाली ते.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. मीडियामध्ये त्यांच्या लग्नाच्या  बातमी देखील बऱ्याचदा येत असतात. नुकतंच आसामच्या गुवाहाटी येथे झालेल्या ६५व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टला 'गल्ली बॉय' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, रेड कार्पेटवर माध्यमांशी बोलताना आलियाने रणबीर कपूरसोबतच्या लग्नविषयीच्या बातम्यांवर देखील भाष्य केलं. 

आलिया म्हणाली की, त्यांच्या लग्नाची बातम्या फक्त अफवा आहेत. ती मीडियामध्ये स्वत: दररोज नवीन तारखा ऐकते. या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या  'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया आणि रणबीर एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...