अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचा खुलासा - पिवळी पडली होती सुशांत सिंहची बॉडी, पायांवर होते निशाण

बी टाऊन
Updated Aug 10, 2020 | 16:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

sushant singh rajput: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे. सुशांतची डेडबॉडी बघणाऱ्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचे म्हणणे आहे की त्याचे शरीर पिवळे पडले होते. तर पायांवर जखमांचे निशाण हो

sushant singh rajput
पिवळी पडली होती सुशांत सिंहची बॉडी, पायांवर होते निशाण 

थोडं पण कामाचं

  • १४ जूनला सुशांत सिंहने केली होती आत्महत्या
  • घरातच गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली होती
  • आत्महत्येचा तपास सीबीआय करत आहे

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात(sushant singh rajput suicide case) नवे खुलासे होत आहेत. सुशांतची डेडबॉडी बघणाऱ्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचे(ambulance driver) म्हणणे आहे की त्याचे शरीर पिवळे पडले होते तर पायांवरही जखमांचे निशाण होते. टाईम्स नाऊने अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरशी बातचीत करताना सांगितले की सुशांतचे पाय दुमडलेले होते. अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या या माहितीमुळे या प्रकरणाला एक वेगळच वळण मिळाले आहे. दरम्यान, सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हातात आहे आणि सीबीआयचे अधिकारी नव्याने या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI)ने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सगळ्यात आधी सुशांतच्या कुटुंबियाचा जबाब सीबीआय घेणार आहे. टाईम्स नाऊच्या सूत्रांनुसार सगळ्यात आधी सीबीआय सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांचा जबाब घेणार आहे. त्यांचा जबाब १० ऑगस्ट म्हणजे आजच घेतला जाणार आहे. 

ई़डीकडून रिया आणि सुशांतच्या जवळच्या लोकांची कसून चौकशी

सुशांतच्या वडिलांकडून पैसे हडपल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयने रिया चक्रवर्तीची कसून चौकशी सुरूवात केली आहे. गेल्या शुक्रवारी रियाची आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या भावाचीही ईडीकडून अनेक तास चौकशी सुरू होती. आज पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आले. ईडीने तिची कमाई आणि प्रॉपर्टीचे रेकॉर्ड मागितले आहेत. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीलाही ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. 

नोकरानेही केले होते महत्त्वाचे खुलासे

सुशांतचा नोकर नीरजनेही काही दिवसांपूर्वी अनेक खुलासे केले. या खुलाश्यांमुले रिया चक्रवर्तीवरही अनेक सवाल उठतात. नीरजने सांगितले की, १३ जूनच्या रात्री सुशांत नॉर्मल होता आणि त्याला अजिबात असे वाटले नव्हते की सुशांत आत्महत्या करेल. अखेरच्या वेळेस सुशांतने त्याच्याकडे पाणी मागितले होते आणि त्याची चौकशी केली. रियासोबत युरोपवरून परतल्यानंतर तो दु:खी होता. आम्हाला माहीती होते की तो काही तणावासाठी औषधे घेत आहे. तेथून परतल्यानंतर ते शांतच राहत होते आणि बराच वेळ झोपून राहत असतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी