[VIDEO]: 'या' सीक्रेट प्रोजेक्टवर काम करतोय अभिनेता आमीर खान

बी टाऊन
Updated Oct 12, 2019 | 20:36 IST | टाइम्स नाऊ हिंदी

एकाच वेळी एका चित्रपटात काम करणारा अभिनेता आमिर खान हा 'लाल सिंग चड्ढा, मोगल आणि त्याचबरोबर महाभारत या तीन चित्रपटांच्या माध्यमातून आगळ्या-वेगळया भूमिकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Entertainment news about Amir khan the film of lal singh chaddha realising the news at mumbai in maharashtra
[VIDEO]: 'या' सीक्रेट प्रोजेक्टवर काम करतोय अभिनेता आमीर खान  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान हा 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटसोबत त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'महाभारत' या चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टींगचं काम सुरु असल्याने चित्रपटाला आणखी काही कालावधी लागणार आहेत.

बॉलिवूड सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी तो खूप व्यस्त आहे असं समजलं जात आहे. या चित्रपटाच्या शुटिंगबरोबरच दुसरीकडे त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ऐतिहासिक चित्रपट 'महाभारत' यासाठी त्याचं काम चालू आहे. महाभारत या चित्रपटाच्या स्क्रिप्टींगचं काम काही लेखकांसोबत चालू असल्याची माहिती आहे.

मागील वर्षी दिवाळीत प्रदर्शित झालेला अभिनेता आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाने प्रेक्षकांची निराज केलं. त्यामुळे, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून काहीसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता आमीर खानचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा हा २०२० च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.

UoGmX07irbg

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी