Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोरोनामुक्त झाल्याने अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह 
  • अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज 

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोरोनावर (Corona) मात केली आहे. अमिताभ बच्चन यांची कोविड-१९ टेस्ट निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने ट्वीट करुन दिली आहे. ११ जुलै २०२० रोजी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

तसेच अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ट्वीट करुन म्हटलं "माझी कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि मला डिस्चार्ज मिळाला आहे. मी घरी आलो असून होम क्वारंटाईन राहणार आहे". अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलेल्या या फोटोत ते हात जोडून उभे असल्याचं दिसत आहेत तसेच त्या फोटोवर धन्यवाद असेही लिहिलेलं आहे.

अमिताभ बच्चन यांची कोविड-१९ टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून आता अमिताभ बच्चन आपल्या घरी परतले आहेत. रुग्णालयातून घरी परतत असल्याचा व्हिडिओ एएनआय न्यूज एजन्सीने ट्वीट केला आहे. 

अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची माहिती अभिषेक बच्चन याने ट्वीट करुन दिली आहे. अभिषेक बच्चन याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "माझ्या वडिलांची कोविड-१९ टेस्टट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरी आराम करणार आहेत. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार".

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींवरही मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

११ जुलै २०२० च्या रात्री अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं. रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी