VIDEO: चंकी पांडेच्या मुलीने आई-वडिलांनाच आणलं अडचणीत

Ananya Pandey revelation about Parents: अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे हिने आपल्या पालकांविषयी एक अतिशय धक्कादायक विधान केलं आहे.

ananya pandey
VIDEO: चंकी पांडेच्या मुलीने आई-वडिलांनाच आणलं अडचणीत  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री या बर्‍याचदा आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. कधीकधी त्या इतक्या उघडपणे बोलतात की, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील अडचणीत येतात. अलीकडेच एका अभिनेत्रीने एक असे विधान केले आहे ज्यामुळे तिचे पालक मात्र अडचणीत आले आहेत. आपले पालक शिव्या देण्याच्या सवयीबद्दल या अभिनेत्रीने दावा केला आहे. पण अभिनेत्रीचा हा दावा तिच्या आईने मात्र फेटाळून लावला आहे.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचं म्हणणं आहे की, तिच्या बालपणी तिचे आई-वडिल हे 'F' या शब्दापासून इतकी शिवीगाळ करायचे अनेकदा तिला तिच्या नावाबद्दल शंका यायची. अनन्या म्हणाली की, तिला कधीकधी असे वाटायचे की हेच तर तिचे नाव नाही ना?

अनन्याने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड' या नवीन वेब सीरीजदरम्यान असं म्हटलं होतं. यामध्येय अनन्या पांडेची आई आणि चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे यांची जीवन कथा दाखविण्यात आली आहे. दरम्यान, मुलीने केलेल्या धक्कादायक खुलासाचा आई भावना पांडेने मात्र इन्कार केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी