VIDEO: सुशांतच्या बँक खात्यातून कोट्यवधींची उलाढाल, अंकिताने म्हटलं...

सुशांत सिंह राजपूत याच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रुपयांची उलाढाल झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रुपयांची उलाढाल झाली आहे आणि या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी तक्रारही दाखल केली आहे. यावर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने टाइम्स नाऊसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे म्हणाली, मला रिया बाबत काहीही माहिती नाहीये. रिया एका मुलाखतीत बोलत होती की मी सुशांतला आठ वर्षांपासून आम्ही एकत्र काम करत होतो, मित्र आहोत. पण मी तरी कधी रियाबाबत सुशांतकडून कधी ऐकलं नव्हतं. आर्थिक व्यवहारांच बोलायचं झालं तर, सुशांतच्या पप्पांनी जर एफआयआर केली आहे तर नक्कीच असे झाले असेल. सुशांतचे पप्पा या आर्थिक व्यवहारांबाबत जे काही बोलत आहेत त्यात तथ्य असेल म्हणून त्यांनी एफआयआर दाखल केली असावी.

आम्ही करिअरची जेव्हा सुरूवात केली तेव्हा इतके पैसे आम्हाला मिळत नव्हते. आम्ही हळूहळू मेहनत करुन पैसे कमावले. मी सुशांतला पैसे सेव्हिंग करण्यासाठी नेहमीच सांगत होती. आपल्या परिवारासाठी काही करायचे सुशांतला नेहमीच आवडत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी