सुशांतच्या निधनानंतर बिहारला जाऊन कुटुंबियांना भेटली? पाहा काय म्हणाली अंकिता लोखंडे

Ankita Lokhande: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडे बिहारमध्ये गेली होती आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली अशा चर्चा होत होत्या. या चर्चेवर अंकिता लोखंडेने प्रतिक्रिया दिली आहे. 

Ankita Lokhande
अंंकिता लोखंडे 

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने टाइम्स नाऊसोबत बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. सुशांतच्या निधनानंतर बिहारला (Bihar) गेली होती, कुटुंबियांची भेट घेतली का? या प्रश्नावर अंकिताने प्रतिक्रिया दिली आहे. अंकिताने टाइम्स नाऊसोबत बोलताना म्हटलं, माझ्याविषयी अनेक फवा पसरवल्या जात आहेत. मी बिहारला गेली नव्हती. सुशांतच्या वडिलांना (Sushant Singh Rajput Father) विचारलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, अंकिता पाटणा येथे आली होती त्यांना म्हणायचं होतं की अंकिता यापूर्वी पाटणा येथे आली होती.

कोविडचा संसर्ग सर्वत्र आहे. मी पाटणा येथे गेलीच नाही. मी सुशांतच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे आणि त्यांना मुंबईत भेटली. पण मी पाटणाला गेली नाही. तसेच बिहार पोलिसांना कुठल्याही प्रकारचे मेसेजेस, स्टेटमेंट दिलेलं नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी