अंकिताने सांगितलं, सुशांतच्या आयुष्यात गेल्या वर्षभरात काय घडलं होतं

Ankita Lokhande: गेल्या एका वर्षभरात असं काय घडलं असावं ज्यामुळे हे सर्व घडलं या प्रश्नावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे (फाईल फोटो) 

मुंबई : सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) एक्स गर्लफ्रेंड आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने टाइम्स नाऊशी बोलताना विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. गेल्या एका वर्षभरात असं काय घडलं असावं ज्यामुळे हे सर्व घडू शकतं? या प्रश्नावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने म्हटलं, सुशांतच्या वडिलांचे मला अनेकदा फोन येत होते. माझं सुशांतसोबत बोलणं करुन दे असं त्याचे वडील मला सांगत होते. मी त्यांना विचारायची की पप्पा तुमच्याकडे मोबाइल नंबर नाहीये का? तर ते म्हणायचे नाही तो नंबर वांरवार बदलत असतो. हे ऐकल्यावर मलाही थोडं विचित्र वाटलं.

अंकिताने पुढे म्हटलं, सुशांतची बहिण राणीसोबत माझं नोव्हेंबर महिन्यात बोलणं झालं. सुशांतला त्यावेळी बहूतेक डेंग्यू झाला होता. राणी रडत होती आणि मला म्हणाली अंकिता आम्ही सुशांतला घेण्यासाठी मुंबईत आलो होतो त्याचं येण्याचं तिकीटही काढण्यात आलं होतं मात्र, अचानक सुशांतने येण्यास नकार दिला. मी मुंबईतच ठिक आहे असं सुशांतने म्हटलं. 

सुशांतच्या आयुष्यात राणी दीदी ही खूपच महत्वाची होती. राणी दीदी जसं सांगत होती तसं सुशांत करत होता. आईनंतर तो राणी दीदीला मानत होता. राणी दीदी म्हणत होती माझ्या भावाला झालं तरी काय आहे? राणी दीदीला सुद्धा सुशांतच्या वागण्याने आश्चर्च वाटलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी