सुशांत डिप्रेशनमध्ये होता का? पाहा काय म्हणतेय अंकिता लोखंडे 

Sushant Singh Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर विविध चर्चा आणि अँगल्स समोर येत आहेत. सुशांत नैराश्यात होता असल्याचंही काहींनी म्हटलं. यावर अंकिता लोखंडेने भाष्य केलं आहे. 

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत 

मुंबई: आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत हा डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते असं काहींनी म्हटलं होतं. यावर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने भाष्य केलं आहे.

रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि ८ जूनपर्यंत ती सुशांतसोबत होती. त्यानंतर नव्हती. तर सुशांतचा जिम ट्रेनर सॅमी अहमद यानेही म्हटलं की सुशांत नैराश्यात नव्हता पण त्याच्या परफॉर्मन्स वर्षभरात कमी झाला होता. यावर टाइम्स नाऊसोबत बोलताना अंकिताने म्हटलं, सॅमी हा चांगला ट्रेनर आहे. सॅमी हा जिम ट्रेनर असल्यामुळे त्याला माहिती हवंच की मेडिटेशन सुरू होतं की नाही. रियाला सुद्धा याबाबत सर्व माहिती हवी. सर्व प्रश्नांची उत्तरे रियाच देऊ शकते. सुशांतसोबत रिया होती आणि तो डिप्रेशनमध्ये होता तर काय असं कारण होतं की ज्यामुळे सुशांत डिप्रेशनमध्ये होता याबाबत रियाच सर्वकाही सांगू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी