सुशांत इतका कमकुवत नव्हता की तो असं काही करेल : अंकिता लोखंडे 

अंकिता लोखंडे कधी इतका कमकुवत नव्हता, की स्वतःला इजा करू शकत नाही, असे सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हीने टाइम्स नाऊशी बोलताना सांगितले. 

ankita lokhande talk about sushant singh rajput carrier graph
सुशांत इतका कमकुवत नव्हता की तो असं काही करेल : अंकिता लोखंडे   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  अंकिता लोखंडे कधी इतका कमकुवत नव्हता, की स्वतःला इजा करू शकत नाही, असे सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हीने टाइम्स नाऊशी बोलताना सांगितले. 

अंकिता लोखंडेने सांगितले की गेल्या एक वर्षांपासून सुशांत सिंह खूप बदलला आहे. तो कमी दिसू लागला होता. मी त्याचा खास मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलले होते. त्याने सांगितले होते की सुशांत बिल्कुल ठीक आहे. 

सुसाइड किंवा मर्डरवर बोलली अंकिता 

अंकिता विचारण्यात आले की सुशांतने आत्महत्या केली की त्याचे मर्डर झाला. या संदर्भात अंकिता लोखंडे यांनी सांगितले, मी हे सांगू शकत नाही की  ही हत्या आहे की आत्महत्या पण असा कोणी आहे ज्याला खरं माहिती आहे की सुशांतने  असे का केले आहे. 

अंकिता लोखंडेनुसार, सुशांत इतका कमजोर कधी नव्हता. इतक्या छोट्या कारणामुळे सुशांत सुसाइड करू शकत नाही. यामागे खूप मोठे कारण असेल. मला नाही माहिती की गेल्या चार वर्षांपासून सुशांत कोणत्या परिस्थितीतून जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी