सुशांत ड्रग्स घेत होता का या प्रश्नावर अंकिता बोलली 

आम्ही एकत्र असताना किंवा आतापर्यंत तो कधीही कोणत्याही गोळ्या किंवा ड्रग्स घेत नव्हता. तो खूप स्ट्रॉंग होता. तो वेगळ्याच प्रकारचा माणूस होता. त्याने ठरवले ते तो करायचा, त्याने एखादी गोष्ट लिहिली ती काहीही झाले त

ankita lokhande talk about sushant singh rajput drug addiction
सुशांत ड्रग्स घेत होता का या प्रश्नावर अंकिता बोलली  

मुंबई : आम्ही एकत्र असताना किंवा आतापर्यंत तो कधीही कोणत्याही गोळ्या किंवा ड्रग्स घेत नव्हता. तो खूप स्ट्रॉंग होता. तो वेगळ्याच प्रकारचा माणूस होता. त्याने ठरवले ते तो करायचा, त्याने एखादी गोष्ट लिहिली ती काहीही झाले तर तो पूर्ण करायचा असे अंकिताने टाइम्स नाऊला दिलेल्या Exclusive मुलाखतीत म्हटले आहे. 

अंकिता लोखंडेने सांगितले की गेल्या एक वर्षांपासून सुशांत सिंह खूप बदलला आहे. तो कमी दिसू लागला होता. मी त्याचा खास मित्र महेश शेट्टी याच्याशी बोलले होते. त्याने सांगितले होते की सुशांत बिल्कुल ठीक आहे. 

सुसाइड किंवा मर्डरवर बोलली अंकिता 

अंकिता विचारण्यात आले की सुशांतने आत्महत्या केली की त्याचे मर्डर झाला. या संदर्भात अंकिता लोखंडे यांनी सांगितले, मी हे सांगू शकत नाही की  ही हत्या आहे की आत्महत्या पण असा कोणी आहे ज्याला खरं माहिती आहे की सुशांतने  असे का केले आहे. 

अंकिता लोखंडेनुसार, सुशांत इतका कमजोर कधी नव्हता. इतक्या छोट्या कारणामुळे सुशांत सुसाइड करू शकत नाही. यामागे खूप मोठे कारण असेल. मला नाही माहिती की गेल्या चार वर्षांपासून सुशांत कोणत्या परिस्थितीतून जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी