The Kashmir Files:IFFI ज्युरी प्रमुखांचा 'द काश्मीर फाईल्स'वर प्रश्न; म्हटलं अश्लील, असभ्य चित्रपट

बी टाऊन
Updated Nov 29, 2022 | 13:12 IST

IFFI या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्य ज्यूरी आणि इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर नाराजी व्यक्त करत या चित्रपटाला असभ्य, अश्लील चित्रपट म्हटलं आहे.  द कश्मीर फाइल्स'ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

थोडं पण कामाचं
  • IFFI च्या प्रमुख ज्यूरींचा द कश्मीर फाइल्सवर निशाणा.
  • द कश्मीर फाइल्स हा प्रचारकी आणि असभ्य चित्रपट- लॅपिड.
  • हा चित्रपट IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात पाहून धक्का बसला- लॅपिड.

The Kashmir Files Controversy: गोवा : गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (International Film Festival) (IFFI) सोमवारी समारोप झाला. या महोत्सवात सर्वाधिक चर्चा राहिली ती विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) दिग्दर्शित केलेला द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रत्रपटावर IFFIच्या प्रमुखांनी केलेली टिप्पणीची. द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाने यावर्षी यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले. पण, जेवढे विक्रम मोडीत काढले तितक्याच प्रमाणात हा चित्रपट वादातही राहिला होता. गोव्यात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI शेवटच्या दिवशीही हा चित्रपट चर्चेत होता कारण या महोत्सवाच्या ज्युरी प्रमुखांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले. महोत्सवाचे प्रमुख  नादव लॅपिड यांनी चित्रपटावर टीका केली.  (Anupam Kher:IFFI Jury,The Kashmir Files Controversy In Marathi)

अधिक वाचा  : राज्यराणी एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवासी गंभीर जखमी

महोत्सवाच्या स्पर्धेत सामील होण्यासही हा सिनेमा पात्र नाही. केवळ प्रचार आणि  प्रसिद्धीसाठी हा चित्रपट बनवला असल्याचे ज्युरी प्रमुखांनी म्हटलं. तसेच हा एक अश्लील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागासाठी योग्य नसल्याचेदेखील ज्युरी प्रमुखांनी म्हटलं. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नादव लॅपिड या व्हिडिओमध्ये विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका करत आहेत. व्हिडिओमध्ये, ते चित्रपटावर टीका करत आहेत. 

अधिक वाचा  : बेळगावमध्ये शिंदे-फडणवीसांच्या पुतळ्याचे दहन

IFFIच्या या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्य ज्यूरी आणि इस्रायलमधील चित्रपट निर्माता नादव लॅपिड यांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली.  चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन पाहून नादव लॅपिड यांनीही आश्चर्य व्यक्त केले. द कश्मीर फाइल्स'ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माता नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाचे वर्णन प्रचारात्मक चित्रपट असल्याचे केले आहे. त्याचबरोबर त्याने याला 'असभ्य' चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. लॅपिड यांनी ही माहिती दिली. दरम्यान या महोत्सवाच्या समारोप समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते. 

अधिक वाचा  : खाण हटवा, सुरजागड वाचवा; खाणीला आदिवासींचा विरोध

कार्यक्रमात बोलताना लॅपिड म्हणाले की,  'या महोत्सवातील सिनेमॅटिक समृद्धी, विविधतेबद्दल आणि गुणवत्तेबाबत मला महोत्सव प्रमुख आणि प्रोग्रॅमिंग दिग्दर्शकाचे आभार मानायचे आहेत. आम्ही नवोदित चित्रपटांच्या स्पर्धेत सात चित्रपट पाहिले आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 15 चित्रपट पाहिले. त्यांपैकी 14 सिनेमांमध्ये आम्हाला सिनेमॅटिक गुणात्मकता, त्यांतील गुण, दोष अशा मुद्द्यांवर ज्वलंत चर्चा घडवून आणल्या.  परंतु 'द कश्मीर फाइल्स' या 15 व्या चित्रपटाने मात्र आम्हा सर्वांनाच त्रास झाला आणि धक्काही बसला.

अधिक वाचा  :  नंदूरबारमध्ये पकडला लाखो रुपयांचा दारूचा साठा

हा चित्रपट अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धात्मक विभागासाठी अयोग्य, अपप्रचार करणारा, आणि असभ्य चित्रपट वाटला. या मंचावर तुमच्याशी या भावना मोकळेपणाने शेअर करण्यात मला पूर्णपणे कंफर्टेबल वाटत आहे. या महोत्सवाचे धाटणी पाहता येथे कला आणि जीवनासाठी आवश्यक असलेली टीकात्मक चर्चा देखील निश्चितपणे स्वीकारार्ह आहे,” ज्यूरी प्रमुखांच्या टीकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या लोकांनी या चित्रपटाचे कौतुक केलं आहे, त्यांना ज्युरी प्रमुखांचे हे मत पटले नसेलच यात शंका नाही. 

दरम्यान, विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, द कश्मीर फाइल्स हा 1990 च्या दशकातील हिंदूना आपले ठिकाण सोडावे लागणे आणि काश्मिरी पंडितांच्या ठरवून केलेल्या हत्यांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर अशा कसदार अभिनेत्यांनी काम केलं आहे. हा चित्रपट  11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.  चित्रपटगृहांमध्येही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी