[VIDEO] प्रिया प्रकाशचा चित्रपट श्रीदेवी बंगला'मध्ये काम करतोय अरबाज खान उघड केले गुपीत

बी टाऊन
Updated Jul 19, 2019 | 21:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलीवूड अभिनेता अरबाज खान हा विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर सोबत 'श्रीदेवी बंगला' या चित्रपटाच्या सेटवर दिसणार आहे. या दरम्यान अरबाजने चित्रपटाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या. 

arbaz khan and sridevi
अरबाज खानने उघड केले श्रीदेवी बंगलाचे गुपीत 

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा छोटा भाऊ अरबाज खान सध्या विंक गर्ल प्रिया प्रकाश वॉरियर सोबत 'श्रीदेवी बंगला' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका मुलाखतीत अरबाज खानने या चित्रपटासंबंधी असलेल्या वादावर उघडपणे बोलले आहे. चित्रपटासंदर्भात  अरबाजने सांगितले,  

या चित्रपटाचा आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबाबत झालेल्या दुदैवी घटनेशी कोणताही संबंध नाही.  हे सर्व समजल्यावरच मी या चित्रपटात काम करण्यास तयार झालो आहे. श्रीदेवी बंगला या चित्रपटाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटातील एका सीनबाबत तसेच चित्रपटाच्या शीर्षकाबाबत श्रीदेवी यांचे पती आणि सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी आक्षेप व्यक्त केला होता. तसेच त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्याला लीगल नोटीस पाठवली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...