बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया देणं अर्जन कपूरला पडलं भारी

Arjun Kapoor trolled on social media: अर्जुन कपूर बॉयकॉट ट्रेंडवर उघडपणे बोलला. अर्जून कपूरने सांगितले की, आपण सर्वांनी आता याविरुद्ध काहीतरी केले पाहिजे, त्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सने त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

arjan kapoor had to react to bollywood boycott trend users trolled arjun on social media
बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया देणं अर्जन कपूरला पडलं भारी  |  फोटो सौजन्य: Instagram

Arjun Kapoor trolled social media: सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनाच्या बॉयकॉटचा प्रभाव चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर स्पष्टपणे दिसत आहे. आता अर्जुन कपूरने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून तो असं म्हणाला की, 'या मुद्द्यावर आम्ही मौन बाळगणे ही आमची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. याचा लोक चुकीचा फायदा घेत आहेत.' (arjan kapoor had to react to bollywood boycott trend users trolled arjun on social media)

तो पुढे म्हणाला, 'आम्हाला आमचे हात घाण करण्याची गरज नाही. पण यापुढे आपण ते सहन करू नये. मला वाटतं आता आपण मिळून काहीतरी करायला हवं. जे लोक ट्रेंड लिहितात किंवा चालवतात त्यांना वास्तवाशी काही देणेघेणे नसते. या लोकांनी स्वत: एक सवय करून घेतली आहे.' अर्जुनच्या या प्रतिक्रियेनंतर संतापलेल्या नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी