VIDEO: "मलायका अरोरासोबत लग्न करणार नाही" पाहा अर्जुन कपूर असं का म्हणाला?

Arjun Kapoor and Malaika Arora: अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिप संदर्भात जोरदार चर्चा आहेत. त्याच दरम्यान आता अर्जुन कपूरने आपल्या लग्नाच्या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. 

arjun kapoor will not mary with malaika arora due to this reason watch video
VIDEO: "मलायका अरोरासोबत लग्न करणार नाही" पाहा अर्जुन कपूर असं का म्हणाला? 

Arjun Kapoor: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिपची नेहमीच जोरदार चर्चा सुरू असते. बॉलिवूडमधील चर्चेत जोड्यांपैकी त्यांची एक जोडी आहे. अलिकडेच अभिनेता अर्जुन कपूर हा कॉफी विथ करण ७ या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री सोनम कपूर सुद्धा उपस्थित होती. यावेळी शोमध्ये अर्जुन कपूर याने मलायकासोबतच्या रिलेशनशिपवर देखील भाष्य केलं आहे.

अर्जुन कपूर याला शोमध्ये विचारण्यात आले की, मलायका अरोरासोबत लग्न करण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नावर अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला, "नाही... आणि हे प्रामाणिकपणे आहे, कारण या लॉकडाऊन आणि कोविडच्या दोन वर्षांच्या काळात जे काही घडत आहे ते सर्व समोर आहे. मला सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी