[VIDEO] आयुष्मान खुराना दिसणार नवीन भूमिकेत, 'ड्रीम गर्ल' बनून चाहत्यांना केलं खूश

बी टाऊन
Updated Aug 14, 2019 | 13:19 IST | Zoom

आयुष्मान खुराना प्रत्येक सिनेमात नवीन आणि पूर्णपणे वेगळी पात्रे साकारण्यासाठी ओळखला जातो, त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमात तो मुलगी बनून चाहत्यांची मने जिंकताना दिसणार आहे.

Ayushmann Khurrana Upcoming Movies
आयुष्मान खुराना  |  फोटो सौजन्य: Instagram

मुबंई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला अलिकडेच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तो त्याच्या प्रत्येक सिनेमात नवीन आणि वेगळ्या पात्रांच्या भूमिकेसाठी ओळखला जातो आणि त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमात तो वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले होते आणि त्यामध्ये आयुष्मानने साडी नेसली होती. ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. यावेळी सिनेमाशी संबंधित काही रंजक गोष्टी आयुष्मान आणि बाकीच्या कलाकारांनी शेअर केल्या. आयुषमान या सिनेमात महिलांच्या भूमिका साकारताना आणि महिलेच्या आवाजात बोलताना दिसत आहे. त्याच्या व्यतिरिक्त या सिनेमात नुसरत भरुचा, अन्नू कपूर आणि विजय राज यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका आहे.

आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ डिसेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलं असून निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...