VIDEO: बाहुबली फेम प्रभासकडे 'हे' तीन बिग बजेट सिनेमा, बजेट तब्बल १००० कोटी रुपये

बाहुबली सिनेमातून सर्वांच्या मनात आपली जागा निर्माण करणारा अभिनेता प्रभास याच्याकडे तीन बिग बजेट सिनेमा आहेत. या तिन्ही बिग बजेट सिनेमांचे एकूण बजेट अंदाजे १००० कोटी रुपयांच्या घरात आहे. 

baahubali fame prabhas has three big budget movies production budget of rs 1000 crore
VIDEO: बाहुबली फेम प्रभासकडे 'हे' तीन बिग बजेट सिनेमा, बजेट तब्बल १००० कोटी रुपये  

सुपरस्टार अभिनेता प्रभास याच्याकडे सध्या बिग बजेट सिनेमांची मालिका आहे. प्रभासकडे तीन बिग बजेट सिनेमा आहेत. यामध्ये आदी पुरुष (Adipurush), राधेश्याम (Radhye Shyam) आणि दीपिका यासोबतच आणखी एक सिनेमा आहे. या तिन्ही सिनेमांची एकत्रित बजेट तब्बल १००० कोटी रुपयांच्या घरात आहे.

प्रभास, सैफ अली खानसोबत आदीपुरुष या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे एकूण बजेट ४५० कोटी रुपये आहे. हा सिनेमा रामायणातून प्रेरित असणार आहे. प्रभास आणि दीपिका पादुकोण हे सुद्धा एका सिनेमात झळकणार असून या सिनेमाचं बजेटही ३०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सूत्रांच्या मते, हा सिनेमा सायन्स फिक्शनवर आधारित असणार आहे. 

तर अभिनेत्री पूजा हेगडेसोबत बाहुबली स्टार प्रभास राधेश्याम सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं एकूण बजेट २५० कोटी रुपये असणार आहे. या तिन्ही चित्रपटांचे एकत्रित बजेट १००० कोटी रुपयांच्या घरात आहे. या सिनेमा निर्मात्यांना अपेक्षा आहे की त्यांचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर दुप्पट गल्ला जमवतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी