Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात किरण माने, म्हणजे राडा होणारच!

बी टाऊन
Updated Oct 03, 2022 | 13:41 IST

Bigg Boss Marathi Kiran Mane: रोखठोक अभिनेता किरण माने हा बिग बॉस मराठी सीझन 4 च्या घरात आपल्याला दिसणार आहे. यावेळी किरण माने घरात नेमकं कसं राहणार याकडेच आता सगळ्यांचे डोळे लागून रहिले आहेत.

Bigg Boss Marathi season 4 Kiran Mane: मुंबई: बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची (Bigg Boss Marathi season 4 Grand Premiere) काल (2 ऑक्टोबर) अत्यंत जोरदार सुरुवात झाली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi) अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. मात्र, असं असलं तरी यामधील एक चेहरा असा आहे की, ज्याची याआधी प्रचंड चर्चा झालेली. तो चेहरा म्हणजे अभिनेता किरण माने याचा.  (season 4 of bigg boss marathi begins  celebrities in bigg boss house)

आपल्या रोखठोक भूमिकेमुळे किरण माने मागील काही महिन्यांपूर्वी प्रचंड चर्चेत आला होता. त्यानंतर आता तो थेट बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला धारदार शब्दांनी किरण माने बिग बॉसच्या घरात कोणावर कसे वार करणार याकडे आता प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले आहेत.

यंदा बिग बॉसची थीम ही 'ALL IS WELL' यावर बेतलेली आहे. त्यामुळे या थीममागे नेमकं गुपित काय? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण बिग बॉसच्या घरात खरोखरच 'ALL IS WELL'असेल का? 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी