[VIDEO] हृतिक रोशन लवकरच 'या' भन्नाट सिनेमात दिसणार!

बी टाऊन
Updated Oct 05, 2019 | 16:52 IST

Hrithik Roshan: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन लवकरच एका नव्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा हा सिनेमा खूपच भन्नाट असणार आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा अॅक्शन पट 'वॉर' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने रिलीज होताच अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केले आहेत. ५३.५५ कोटींच्या कमाईसह हा सिनेमा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे. या सिनेमाच्या यशानंतर आता हृतिक रोशन लवकरचत आपला नवा सिनेमा क्रिश ४ साठी शूटिंग सुरु करणार आहे. 

या सिनेमाचं शूटिंग हे हृतिकचे वडिल राकेश रोशन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रखडलं होतं. पण आता त्याच्या राकेश रोशन यांची प्रकृती पूर्णत: चांगली झाल्याने हृतिक देखील या प्रोजेक्टवर लवकरच काम सुरु करणार आहे. याबाबत स्वत: हृतिक रोशनने एका मुलाखतीत माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...