[VIDEO] करण जोहरच्या बिग बजेट सिनेमाला अक्षयने दिला नकार

बी टाऊन
Updated Nov 20, 2019 | 18:57 IST

अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. मात्र या सिनेमाच्या दरम्यान अक्षयने, निर्माता करण जोहरच्या एका सिनेमाला रिजेक्ट केलं होतं. त्यासंदर्भात अक्षयने खुलासा केला आहे.

थोडं पण कामाचं

  • अभिनेता अक्षय कुमारचा अपकमिंग सिनेमा 'गुड न्यूज' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
  • निर्माता करण जोहरच्या एका बिग बजेट सिनेमाबाबत अक्षयने खुलासा केला आहे
  • गुड न्यूज या सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता आणि निर्माता करण जोहर आहेत

मुंबई : 'हाऊसफुल ४' या सिनेमाच्या यशानंतर, अभिनेता अक्षय कुमारचा अपकमिंग सिनेमा 'गुड न्यूज' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झालं असून, प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा हाऊसफुल ४ सारखाच कॉमेडी असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. अक्षय व्यतिरिक्त करिना कपूर, कियारा अडवानी आणि दिलजीत दोसांज या सिनेमात दिसणार आहेत. तसंच निर्माता करण जोहरच्या एका बिग बजेट सिनेमाबाबत अक्षयने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत, अक्षयने सांगितलं की, निर्माता करण जोहर माझ्यासोबत एक बिग बजेट सिनेमा करणार होता. मात्र त्या सिनेमाची स्टोरी २ तासांची होती आणि दुसऱ्या सिनेमाबाबत विचारलं असता, त्याने गुड न्यूज या सिनेमाची स्टोरी सांगितली. त्यानंतर या सिनेमाची स्टोरी मला खूपच चांगली वाटली. त्यामुळे मी या सिनेमाला तयार झालो. तसंच करण जोहरने सांगितलं की, मेगास्टार अक्षयसारखा अभिनेता मी कधीचं पाहिलेला नाही. कारण. त्याच्यामध्ये एक खास गोष्ट आहे. ती म्हणजे, जेव्हा अक्षय कोणत्याही सिनेमात काम करायला तयार होतो. तेव्हा तो सिनेमाचं बजेट आणि दिग्दर्शक पाहत नाही; तर तो फक्त सिनेमाची संकल्पना काय आहे आणि हा सिनेमा कशावर आधारीत आहे. या सर्व प्रकारच्या गोष्टी तो पाहतो. 

 

 

गुड न्यूज या सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता आणि निर्माता करण जोहर आहेत. या सिनेमाचा ट्रेलर खूप कॉमेडी आहे. ट्रेलरमधील अक्षय, करिना, दिलजीत आणि कियारा या चौघांचा लूक आगळवेगळं दिसत आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भरपूर धमाल करेल, असा अंदाज आहे. तसंच हा सिनेमा २७ डिसेंबर २०१९ ला रिलीज होणार आहे.

गुड न्यूज या सिनेमानंतर अक्षयचा अपकमिंग सिनेमा सूर्यवंशी, लक्ष्मी बॉम्ब, हेरा फेरी ३ आणि पृथ्वीराज हे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांसाठी अजून एक मोठी गुडन्यूज असणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी