[VIDEO] Bala Trailer: 'या' सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीही हसू रोखू शकणार नाहीत!

बी टाऊन
Updated Oct 11, 2019 | 10:30 IST

Ayushmann Khurrana Starrer Bala Trailer out watch video: अभिनेता आयुष्मान खुराना याचा नवा सिनेमा 'बाला' हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच अतिशय धमाकेदार असा त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

मुंबई: Ayushmann Khurrana Starrer Bala Trailer out watch video: बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असतानाच दुसरीकडे आता त्याच्या आगामी सिनेमा 'बाला' याचा भन्नाट ट्रेलर समोर आला आहे. इतर सिनेमांप्रमाणेच त्याचा हा सिनेमा देखील पोट धरून हसायला लावणारा आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना हा नव्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तो केस कमी असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. 

२ मिनिटं ४७ सेंकदाचा हा ट्रेलर अतिशय जबरदस्त आहे. या सिनेमात काही असे पंच आहेत की, जे तुम्हाला प्रचंड हसायला लावतात. ट्रेलरच्याच सुरुवातीला अभिनेत्री भूमी पेडणेकर ही सेल्समन बनलेल्या आयुष्मानची टोपी उडवते. त्यामुळे संपूर्ण क्लास त्याची खिल्ली उडवतं. ३६ वर्षाचा आयुष्मान हा केस झडत असल्याने खूप त्रासलेला असतो. ज्यामुळे त्याचं लग्न झालेलं नसतं. या संपूर्ण कथेभोवतीच हा सिनेमा गमतीशीरपणे गुंफलेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी