[VIDEO] वाढदिवशी पार्टी करणं अजिबात आवडत नाही दीपिकाला

बी टाऊन
Updated Jan 07, 2020 | 16:45 IST

Deepika Padukone birthday special: दीपिकाला तिच्या वाढदिवशी काय गिफ्ट हवं  असतं  आणि ती किचा वाढदिवस कसा साजरा करते, हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ:  

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या आपला आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर बेतलेला आहे. ५ जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस होता. झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने छपाक आणि तिचा वाढदिवस या दोन्ही गोष्टींवर बातचीत केली.

यावेळी जेव्हा दीपिकाला विचारण्यात आलं की, ती आपला बर्थडे कसा सेलिब्रेट करते तेव्हा तिने उत्तर दिलं की, तिला बर्थडे सेलिब्रेट करणं किंवा पार्टी करणं अजिबात आवडत नाही. तिला फक्त आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवणं आवडतं. पाहा हा संपूर्ण व्हिडिओ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी