जान्हवी कपूरच्या 'गुड लक जेरी'चा ट्रेलर रिलीज, पाहा तिचा लुक

बी टाऊन
Updated Jul 14, 2022 | 20:04 IST

GOOD LUCK JERRY TRAILER: 'गुड लक जेरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूर एका वेगळ्याच लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

GOOD LUCK JERRY: अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गुड लक जेरी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर हास्य आणि विनोदांनी भरलेला आहे. ट्रेलर पाहून तरी  असाच अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटात जान्हवी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. 

'गुड लक जेरी'मध्ये जान्हवी बिहारमधील एका साध्या मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील जान्हवीचे नाव जेरी आहे, जी तिच्या आईवर उपचार करण्यासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे. मग ती पैशासाठी ड्रग्ज पुरवण्याच्या धंद्यात अडकते. 

जान्हवी कपूरची खास गोष्ट म्हणजे ती तिच्या भूमिकेत येण्यासाठी खूप मेहनत करते. 'धडक' या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिने राजस्थानी बोली शिकली होती. आता ती 'गुड लक जेरी' या चित्रपटासाठी बिहारी बोली शिकली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी