बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड

Actress Kangana Ranaut । ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव्ह असलेल्या कंगनाचे अकाऊंट ट्विटरवर शोधले तर असे दिसत आहे की तिचे @KanganaTeam अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड
bollywood actress kangana ranaut twitter account suspended 

थोडं पण कामाचं

  •  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.
  • बंगाल निवडणुकीच्या निकालावर अनेक वादग्रस्त ट्विटनंतर त्यांच्या अकाउंटविरूद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे
  • ट्विटरवर कंगना खूप अ‍ॅक्टिव असते आणि प्रत्येक विषयावर टीप्पणी करण्यासाठी ती ओळखली जाते.

Kangana Ranaut । नवी दिल्ली:  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. ट्विटरवर खूप अ‍ॅक्टिव्ह असलेल्या कंगनाचे अकाऊंट शोधल्यास असा मेसेज येत की @KanganaTeam अकाऊंट सस्पेंड झाले आहे. अकाउंट डिलीट केल्यानंतर ट्विटरवर#KanganaRanaut हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

बंगाल निवडणुकीच्या निकालावर अनेक वादग्रस्त ट्विटनंतर त्यांच्या अकाउंटविरूद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  तिच्या ट्विटवरून असा अभास होत आहे की ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना  २००० च्या  सुरुवातीच्या काळात 'विराट' रूप धारण करून ममता बॅनर्जी यांना 'नियंत्रित' करण्यासाठी आग्रह करत आहेत असं वाटलं. तिच्या या ट्विटने वाद निर्माण झाला आणि तिच्या अकाऊंटवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

kangana tweet


ट्विटरवर कंगना खूप अ‍ॅक्टिव असते आणि प्रत्येक विषयावर टीप्पणी करण्यासाठी ती ओळखली जाते. बर्‍याच मुद्द्यांवर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्यावर कठोर टीका केली जात आहे. विशेषत: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरोधात अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दलच्या वक्तव्यांविरोधात ती अनेक महिन्यांपासून चर्चेत राहिली होती.

kangana twitter

अलीकडेच तिने जाहीर केले की ती लवकरच 'कू' या ट्विटरच्या भारतीय पर्यायी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी