ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या आलियाच्या समर्थनार्थ करिना उतरली मैदानात

Kareena Kapoor on Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवरुन काहीजण तिला ट्रोल करत आहेत. 

Bollywood actress kareena kapoor reaction after trollers criticise alia bhatt watch video entertainment news
ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेल्या आलियाच्या समर्थनार्थ करिना उतरली मैदानात 

Kareena Kapoor supports Alia: आलिया भट्ट प्रेग्नेंट आहे. असे असतानाही ती आपल्या कामावरही पूर्ण लक्ष देत आहे. एकीकडे युजर्सने आलियाच्या प्रेग्नेंसीचे समर्थन केले आहे तर दुसरीकडे काही युजर्सने आलियाला ट्रोल केलं आहे. प्रग्नेंसीसाठी आलिया खूपच लहान असल्याचं ट्रोलर्स म्हणत आहेत. आलियाच्या प्रेग्नेंसीवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच दरम्यान अभिनेत्री करिना कपूरने आलियाच्या समर्थनार्थ पाऊल टाकले आहे. करिनाने आलियाला खूप धाडसी म्हटले आहे. तसेच आलियाचे कौतुक केले आणि ती खूप प्रतिभावान असल्याचे सांगितले आहे. (Bollywood actress kareena kapoor reaction after trollers criticise alia bhatt watch video entertainment news)

करिनाने म्हटलं, ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. तिला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाहीये कारण, ती खूप हुशार आहे. करिना कपूर सध्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटावरुन एक्साइटेड आहे. तिने सांगितले की, या सिनेमाच्या स्क्रिप्टमुळे हा सिनेमा करायचं ठरवलं. मी माझ्या करिअरमध्ये आतापर्यंत अशी भूमिका केलेली नाहीये असंही तिने म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी