ड्रग्स चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव

bollywood drug case deepika padukone and karishma drug chat बॉलिवूड ड्रग्स केसमध्ये दीपिका पदुकोणचे एक मोबाइल चॅट समोर आले आहे.

bollywood drug case deepika padukone and karishma drug chat
ड्रग्स चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव 

थोडं पण कामाचं

  • ड्रग्स चॅटमध्ये दीपिका पदुकोणचे नाव
  • ड्रग्स केसमध्ये श्रद्धा कपूर आणि जया साहा यांचे चॅट तपास पथकाच्या हाती
  • बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी सुरू होण्याची शक्यता

मुंबईः नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau - NCB) बॉलिवूड (Bollywood) ड्रग्स (Drugs) केसचा (Case) तपास करत आहे. या प्रकरणात दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) एक मोबाइल चॅट (Mobile Chat) समोर आले आहे. यात दीपिका क्वान (KWAN) टॅलेंट मॅनजमेंट कंपनीच्या करिश्मासोबत चर्चा करत आहे. दोघी ड्रग्स संदर्भात बोलत असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच दीपिकाला समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. (bollywood drug case deepika padukone and karishma drug chat )

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अटक झाल्यानंतर बॉलिवूड ड्रग्स केसमध्ये हळू हळू अनेक दिग्गजांची नावं समोर येत आहेत. सारा अली खान (Sara Ali Khan), रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या पाठोपाठ आता दीपिकालाही एनसीबी चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. 

चौकशी दरम्यान उघड झालेल्या एका चॅटमध्ये दीपिका करिश्माला प्रश्न विचारताना दिसत आहे. दीपिका विचारते, तुझ्याकडे माल आहे का? दीपिकाच्या प्रश्नाला करिश्मा उत्तर देते. करिश्मा म्हणते, माझ्याकडे आहे पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे. तू म्हणत असशील तर अमितला विचारते. करिश्माला दीपिका म्हणते, हो विचार प्लीज. थोड्य़ाच वेळात करिश्माचे दीपिकाला उत्तर येते, अमितकडे आहे, तो घेऊन चाललाय. दीपिका म्हणते, हश नं, वीड नाही. हे ड्रग्स चॅट ऑक्टोबर २०१७ मधील आहे.

टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि श्रद्धा कपूर यांचेही एक चॅट तपास पथकाच्या हाती आले आहे. जया साहा मोबाइल चॅटमध्ये एस (S), डी (D), के (K), एन (N) या सांकेतिक नावांनी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींशी चर्चा करत असल्याचे दिसत आहे. यातील एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि डी म्हणजे बॉलिवूडची सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री आणि करण जोहरच्या पार्टीत दिसलेली दीपिका असल्याचा संशय व्यक्त होत आहे. के ही ९०च्या दशकातील मेगा स्टार आणि एन नावाची व्यक्तीही बॉलिवूड सेलिब्रेटी असल्याचे वृत्त आहे. महत्त्वाचे म्हणजे सुशांतसोबत रिया चक्रवर्ती तसेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनी अभिनय केला आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सारा यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी तपास सुरू असताना हाती आलेल्या मोबाइल चॅटमधून ड्रग्स केसला सुरुवात झाली. या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह अनेकांना अटक झाली आहे. लवकरच बॉलिवूडमधील दिग्गजांची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय, सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाला आहे की नाही याचा तपास करण्यासाठी इडी आणि बॉलिवूडमधील ड्रग्स केसच्या तपासासाठी एनसीबी चौकशी करत आहे. एनसीबीने अनेकांना अटक केली असून ड्रग्स केसमध्ये लवकरच बड्यांची चौकशी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी