दीपिका, सारा, श्रद्धाच्या साक्षीतून मोठा खुलासा

bollywood drug case ncb detects patterns of statements of deepika sara shraddha बॉलिवूड ड्रग केसमध्ये एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी केली. या चौकशीतून मोठा खुलासा झाला.

bollywood drug case ncb detects patterns of statements of deepika sara shraddha
दीपिका, सारा, श्रद्धाच्या साक्षीतून मोठा खुलासा 

थोडं पण कामाचं

  • दीपिका, सारा, श्रद्धाच्या साक्षीतून मोठा खुलासा
  • दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशीतून मोठा खुलासा
  • एनसीबी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरसह आणखी काही दिग्गजांची लवकरच नव्याने चौकशी करण्याची शक्यता

मुंबईः बॉलिवूड (Bollywood) ड्रग (Drug) केस (Case) प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau - NCB) दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या तीन अभिनेत्रींची (Famous Actress) चौकशी केली. या चौकशीतून मोठा खुलासा झाला. (bollywood drug case ncb detects patterns of statements of deepika sara shraddha)

एनसीबीसमोर साक्ष देताना दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी बऱ्याच प्रश्नांना एकसारखी उत्तरे दिली. विशेष म्हणजे या उत्तरांतील अनेक शब्दांची रचना समसमान होती. यामुळे सिनेमाच्या संवादांप्रमाणेच अभिनेत्रींनी एनसीबीला द्यायची माहितीही परस्पर ठरवून पाठांतर करुन मगच सांगितली असा संशय एनसीबीला आला आहे. 

चौकशीसाठी आधी एनसीबीने करिश्मा आणि दीपिक यांना एकाच दिवशी बोलावले होते. मात्र दीपिकाने मुंबईत पोहोचायला वेळ लागत असल्याचे कारण देत एक दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. एनसीबीने ही मुदत देताना आधी करिश्माची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा करिश्माला बोलावण्यात आले. याच दिवशी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी झाली. दीपिका, सारा आणि श्रद्धाची स्वतंत्रपणे चौकशी झाली तरी त्यात अनेक बाबी समान होत्या. याच कारणामुळे एनसीबीला अभिनेत्रींनी ठरवून साक्ष दिल्याचा संशय येत आहे. 

करिश्मा ही दीपिकासोबत टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. एनसीबीने केलेल्या चौकशीची माहिती करिश्माने दीपिकामार्फत सारा आणि श्रद्धापर्यंत पोहोचवल्याची शक्यता आहे. यानंतर तिघींनी परस्पर संगनमताने साक्षीतले काही मुद्दे समान राहतील याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र दुसऱ्याने लिहिलेले संवाद बोलण्याची सवय असल्यामुळे तिन्ही अभिनेत्रींनी पाठांतर केल्याप्रमाणे समान शब्द रचना असलेली साक्ष दिली. एनसीबी या संशयाची खातरजमा करुन घेण्यासाठी लवकरच दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची पुन्हा चौकशी करण्याची शक्यता आहे. या चौकशीत उलटसुलट प्रश्न विचारले जाण्याची तसेच एखाद्या मुद्यावर सविस्तर माहिती मागितली जाण्याची दाट शक्यता आहे. नव्या चौकशीद्वारे साक्ष ठरवून दिली जात आहे की त्या मागे नैसर्गिक माहिती देण्याचे स्वरुप आहे, हे तपासले जाणार आहे.

आतापर्यंत मर्यादीत अभिनेत्रींभोवती गुंतले असलेले चौकशीचे जाळे लवकरच आणखी विस्तारण्याची शक्यता आहे. एनसीबी काही अभिनेत्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. एनसीबीने बॉलिवूड ड्रग केसमध्ये तब्बल ४५ मोबाइलमधील डेटा तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या तपासातून एनसीबीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. एनसीबी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने डीलीट केलेला डेटा शोधून कोणती माहिती लपवली जात आहे याचाही तपास करत आहे. 

सध्या बॉलिवूड ड्रग केसमध्ये १२पेक्षा जास्त जणांना अटक झाली आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या कोठडीची मुदत ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तोपर्यंत या प्रकरणात आणखी ठोस माहिती हाती आल्यास तुरुंगात असलेल्यांचा तिथला मुक्काम वाढण्याची तसेच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी