[VIDEO] आमिर खानला 'या' चित्रपटासाठी मागणी

बी टाऊन
Updated Dec 12, 2019 | 18:16 IST

'लाल सिंग चड्ढा' या सिनेमानंतर, सुपरस्टार आमिर खानचा मोगुल हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच या सिनेमाबाबत निर्माता भूषण कुमारने काही माहिती सांगितली आहे.

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या 'मोगुल' या सिनेमाची चर्चा सध्या चालू आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज केला होता. तसंच या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचं नाव लिहिलं होतं. कारण या सिनेमात खिलाडी अक्षय कुमार काम करणार होता. परंतु त्याने या सिनेमास नकार दिला. अक्षयने नकार दिल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला निर्माता भूषण कुमारने अप्रोच केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोगुल या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर आणि निर्माता भूषण कुमार आहेत. भूषण कुमार यांनी या सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी अभिनेता आमिर खानला पसंती दिली आहे. हा सिनेमा टी-सिरीज संगीताचे संस्थापक आणि बॉलिवूड सिनेमाचे निर्माता गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. तसंच अभिनेता आमिर खानच्या जोडीला अभिनेत्री मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समजलं जातयं.

भूषण कुमार यांनी सिनेमाबाबत असं सांगितलं :
मोगुल या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आम्ही या सिनेमात अभिनेता आमिर खानसोबत काम करणार आहोत. परंतु आमिर आपल्या लाल सिंग चड्ढा या सिनेमात बिझी असल्यामुळे, मुगल सिनेमाच्या प्रोडक्शनसाठी वाट पाहावी लागणार आहे. या सिनेमात आमिरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून या सिनेमाच्या भूमिकेसाठी आमिर काही महिन्यांचा कालावधी घेणार असल्याचं समजलं जातयं. 

दरम्यान, अभिनेता आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या सिनेमाची शूटिंग सध्या चालू आहे. तसंच हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी