ईदनिमित्त शाहरुख खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट

Shah Rukh Khan EID 2022: दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे, शाहरुख खान त्याचा धाकटा मुलगा अबरामसह मन्नतच्या बाल्कनीत आला आणि चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

bollywood king shahrukh khan fulfilled wishes of fans gave edi by coming to balcony with abram
ईदनिमित्त शाहरुख खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट  |  फोटो सौजन्य: Instagram

Shah Rukh Khan EID 2022 Video: मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान प्रत्येक वेळी ईदच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करतो. ईद असो की बकरी ईद, शाहरुख आपल्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाही. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. 

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यावेळीही शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबरामसह मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना  अभिवादन केले. या खास प्रसंगी किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर दिसले. दरवर्षी ईदच्या निमित्ताने शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर मन्नतची एक झलक पाहण्यासाठी जमतात. या खास प्रसंगी शाहरुखने चाहत्यांची इच्छाही पूर्ण केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी