[VIDEO]: तुमचे आवडते सेलिब्रिटी 'या' गोष्टीत आहेत बिझी

बी टाऊन
Updated Nov 06, 2019 | 23:29 IST | Zoom

तुमचे आवडते बॉलिवूड स्टार्स सध्या कोणत्या कामात बिझी आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...

Entertainment news bollywood actor and actress are busy in their work the news in marathi google batmya
[video] ...या गोष्टींमध्ये आहेत बॉलीवुड स्टार्स बिझी, पाहा या व्हिडिओतून  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या चाहत्यांची संख्या मोठी असते. आपले आवडते सेलेब्स कोठे आणि काय कामात बिझी आहेत हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असतेच. आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की तुमचे आवडते सेलिब्रिटी सध्या कुठल्या कामात बिझी आहेत. अभिनेते ऋषी कपूर हे जुहू येथे आपल्या गाडीत सोबत दिसून आले. जान्हवी कपूरसुद्धा आपल्या आगळ्या-वेगळया लूकमध्ये दिसून आली. 'पागलपंती' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर,अनिल कपूरच्या व्यतिरिक्त इलियाना डिक्रुझ, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट,आणि कीर्ति खरबंदा आपल्या सिनेमाचं प्रमोशन करतांना दिसत आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्यांना भरपूर आनंद झाला आहे. तसेच मनिष पॉलच्या 'शो' मध्ये सारा अली खान आणि रोहित शेट्टीची शूटिंग करण्यात आली.

'मरजावां' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं प्रमोशन करतांना सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया एकत्र दिसत आहेत. टायगर श्रॉफ एका सिंपल लूकमध्ये दिसून आला तो अॅस्ट्रोलॉजी ऑफिसमध्ये. अभिनेता विकी कौशल आपल्या भन्नाट लूकमध्ये दिसतोय. विकी कौशलला बालाजी ऑफिसच्या बाहेर स्पॅाट केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी